आर्य वैश्य समाज संघटनेच्या भोकर तालुकाध्यक्षपदी महेश नारलावार
तर सचिवपदी व्यंकटेश पोकलवार यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आर्य वैश्य समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आदी समस्या सोडविण्यासाठी सेवारत असलेल्या आर्य वैश्य समाज संघटनेची भोकर तालुका नुतन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी येथील प्रसिद्ध छायाचित्रकार तथा समाजाचे तरुण सेवाभावी व्यक्तीमत महेश नारलावार यांची,तर सचिवपदी तरुण उद्योजक व्यंकटेश पोकलवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरील कार्यकारिणीच्या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे समाजासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
आर्य वैश्य समाज संघटनेच्या माध्यमातून समाजातील सामाजिक,शैक्षणिक व आदी समस्या सोडविण्यासाठी,तसेच सामाजिक,धार्मिक व लोकोपयोगी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून समाजसेवा करण्यासाठी सेवारत असलेल्या भोकर तालुका आर्य वैश्य समाज संघटनेची भोकर तालुका नुतन कार्यकारिणी निवडण्याच्या अनुषंगाने दि.३ जून २०२३ रोजी श्री बालाजी मंदिर,नवा मोंढा भोकर येथे समाज भुषण अशोकराव चिंतावार यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे मावळते अध्यक्ष माजी नगरसेवक सुवेश पोकलवार,उद्योजक प्रशांत पोपशेटवार,दत्तू बंडावार, श्याम पोकलवार यांसह आदींच्या प्रमुख उपस्थितीत भोकर तालुका व शहरातील समाज बांधवांची एक महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली.यावेळी समाजातील समस्या व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी आणि लोकोपयोगी उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच चर्चेअंती बिनविरोध नुतन कार्यकारिणी निवडण्यास्तवचा निर्णय घेण्यात आला व नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
निवडण्यात आलेल्या नुतन कार्यकारिणीचे उर्वरित पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.उपाध्यक्षपदी बालाजी बच्चेवार,अविनाश अमीलकंठवार, कोषाध्यक्षपदी अमोल मारुडवार,संघटक प्रमुखपदी साईप्रसाद जटालवार व सह संघटक प्रमुखपदी साई मनुरवार यांची निवड करण्यात आली.सदरील बैठकीस बंडू मोरलवार,दिलीप उत्तरवार,नंदकुमार ऱ्याकावार, दिलीप तेललवार,शंकर पसनूरवार,संजय चिंतावार, मधूकर पळशीकर,विष्णू नारलावार,संतोष उत्तरवार, संजय नारलावार,निशिकांत तुप्तेवार यांसह बहुसंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती.निवडण्यात असलेल्या कार्यकारिणीच्या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित समाज बांधवांनी यथोचित सत्कार केला व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून सदरील पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराकडून ही सर्व पदाधिकाऱ्यांचे अगदी मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी मनापासून शुभेच्छा!