Mon. Dec 23rd, 2024

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी १९ जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  

Spread the love

शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन २०२१ -२२ ही घेतली जात आहे. ही परीक्षा रविवार,दि.१९ जून २०२२ रोजी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील पुढील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

रविवार सकाळी १०:३० ते दुपारी ३:०० यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक,पालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर,दिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970,9421293747 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

आयोजित करण्यात आलेली परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.नुतन जि.प.प्रा.शाळाभोकर,जनता हायस्‍कूल नायगाव,महात्‍मा ज्‍योतिबा फुले उमवि गोकुंदा किनवट,श्री शिवाजी हायस्‍कूल कंधार,केंब्रिज माध्‍यमिक विद्यालय शिवाजीनगर नांदेड,मानव्‍य विकास उमवि देगलूर,गुजराती हायस्‍कूल वजिराबाद नांदेड, पंचशील विद्यार्जन विद्यालय हदगाव,श्री संत गाडगेबाबा महाराज उमवि लोहा,नुतन हायस्‍कूल,उमरी,मिनाक्षी देशमुख हायस्‍कूल अर्धापुर,महात्‍मा गांधी उमवि मुदखेड,लिटल फॅ्लावर कॉव्‍हेन्‍ट स्‍कूलबिलोली ही परीक्षा केंद्र आहेत.

शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

शिष्‍यवृत्‍ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन २०२१-२२ही रविवार,दि.१९ जून  २०२२ रोजी जिल्ह्यात १३ परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.या परीक्षा केंद्रापासून १००मीटर परिसरात रविवार,दि.१९ जून रोजी सकाळी ८:३० ते सायं ५:०० वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील १०० मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी,आय.एस.डी, भ्रमणध्वनी,फॅक्स,झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे  कलम १४४ अन्वये आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !