आद्यकवि वाल्मिक ॠषी जयंती सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे-नागनाथ घिसेवाड
भोकर येथील या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे,मा.खा.सुभाष वानखेडे,आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथे दि.३० ऑक्टोंबर रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांची सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण,शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे(ठाकरे गट),मा. खा.सुभाष वानखेडे, आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी या जयंती सोहळ्यास भोकर तालुका,शहर व परिसरातील समाज बांधव आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन लोकनेते माजी सभापती तथा जयंती सोहळ्याचे आयोजक नागनाथ घिसेवाड यांनी केले आहे.
भोकर येथील गणराज फुड अँड रेस्टॉरंट येथे दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांनी दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी भोकर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असलेल्या आद्यकवि वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती सोहळ्याविषयी माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या पत्रकार परिषदेस कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड व डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पाराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील पत्रकार परिषदेत माहिती देतांना माजी सभापती नागनाथ घिसेवाड म्हणाले की,आद्यकवि महर्षी वाल्मिक ऋषी यांचा सार्वजनिक जयंती सोहळा दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी भोकर येथे आयोजित करण्यात आला असून दुपारी २:०० वाजता वाल्मिक ऋषी मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्याने तैल चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर मिरवणुकीच्या सांगतेनंतर सायंकाळी ६:०० वाजता नवा मोंढा मैदानावर प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोकराव चव्हाण हे राहणार असून प्रमुख वक्त्या म्हणून शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुभाष वानखेडे,आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांसह आदीं मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
आद्यकवी महर्षी वाल्मिक ॠषी यांनी लिहिलेल्या रामायणातील रामचरित्रांतुन सामाजिक गुण,दिव्य कौटुंबिक जीवन आणि जीवनातल्या श्रेष्ठ नैतिक मूल्याचे अधिष्ठान उभे केले आहे.हे काव्य त्यांनी किर्ती किंवा संपत्ती मिळवण्यासाठी लिहिले नाही,तर हजारो वर्षांपर्यंत आदर्श आणि उच्चतम जीवन कसे असले पाहिजे याचे ज्ञान माणसाला व्हावे ह्या पवित्र हेतूने रामायण लिहले आहे. त्यांचा हा पवित्र हेतू साध्य व्हावा व त्यांचे लोकोत्तर जीवनकार्य समजून घेण्यासाठी या सार्वजनिक जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भोकर तालुका,शहर आणि परिसरातील सर्व रामायण तथा महर्षी वाल्मिक ऋषी प्रेमी नागरिक,समाज बांधवांनी या जयंती सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेद्वारे माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांनी केले आहे.
दीपावली व काँग्रेसचे जेष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खालील मान्यवर व आम्हा कडून अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
🌹🌺🌹
उत्तम बाबळे,संपादक