आदिवासी आश्रम शाळा साळवाडी येथे आज होत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण
संविधान दिनी होत असलेल्या या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे – बालाजी शिंदे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान संचलित आदिवासी आश्रम शाळा साळवाडी ता.भोकर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून संविधान दिन तथा सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी १:०० वाजता माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण,आ.भिमराव केराम यांच्या हस्ते या पुतळ्याचे होणार आहे.तरी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी नेते तथा उपरोक्त प्रतिष्ठान चे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केले आहे.
श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान नांदेड चे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी अथक परिश्रमातून मौ.साळवाडी ता.भोकर येथे सर्व सुविधांनी वसलेली व यशस्वी विद्यार्थ्यांच्या चढत्या गुणवत्तेच्या आलेखाने जिल्ह्यात सर्वपरिचित असलेली आदिवासी आश्रम शाळा उभारली असून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या प्रतिभेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी शाळेच्या प्रांगणात श्री संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारले आहेत.तसेच विश्वभुषण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा देखील नुकताच उभारण्यात आला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने समता,स्वातंत्र्य,बंधूभाव,न्याय यावर आधारित भारतीय संविधान लिहले आहे.ते संविधान दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू,राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या माध्यमातून तमाम भारतीयांना दिले आहे.त्या संविधान दिनाचे औचित्य साधून आदिवासी आश्रम शाळा साळवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण व आदिवासी समाजाचे नेते तथा आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भिक्खू विनयबोधी प्रिय महाथेरो हे राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आ.नागेश पाटील आष्टीकर,प्रकाश देशमुख भोसीकर,शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे,डॉ.बी.डी.चव्हाण,सभापती जगदीश पाटील भोसीकर,बाळासाहेब सानप,बापुराव गजभारे,डॉ.पी.बी.कुंभार, विजय सोनवणे,जाकेर चाऊस,एल.ए.हिरे,शिवाजी देवतुळे,अपर आयुक्त सुरेश वानखेडे अमरावती,प्रकल्प अधिकारी किनवट नेहा भोसले हे उपस्थित राहणार आहेत.तसेच सकाळी १०:०० वाजता वादळवारा फेम प्रसिद्ध गायक प्रबोधनकार शाहीर अनिरुद्ध बनकर यांचा प्रबोधनपर गिताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तरी उपरोक्त सर्व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बालाजी शिंदे,सर्व संचालक,शाळेचे मुख्याध्यापक व आदींनी केले आहे.