आज भोकर येथे होत आहे ग्रेड बेल्ट वितरण व सत्कार सोहळा
मिशन मार्शल आर्ट्स & वुशू,कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया शाखा भोकर आणि ऑल नांदेड जिल्हा तेंग-सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मिशन मार्शल आर्ट्स & वुशू,कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया शाखा भोकर आणि ऑल नांदेड जिल्हा तेंग-सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१३ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता मंजुळा नगर मैदान,भोकर येथे ग्रेड बेल्ट वितरण व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य कराटे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच बालाजी एल. गाडेकर यांनी केले आहे.
सेल्फ डिफेन्स,कराटे स्टोक,कराटे बेल्ट वितरण,ब्लॅक बेल्ट वितरण,राज्य व राष्ट्रीय रग्बी खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप,नांदेड जिल्ह्यातील तैंग सू डो रेफ्री आणि राष्ट्रीय रग्बी स्पर्धेतील खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे उद्घाटन भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते होणार आहे.तर अध्यक्षस्थानी मिशन मार्शल आर्टस वुशू कुंग-फु कराटे असोसिएशन इंडिया चे अध्यक्ष मास्टर पवन व्ही.घुगे हे राहणार आहेत.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार राजेश लांडगे,पोलीस निरीक्षक विकास पाटील, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, संपादक उत्तम बाबळे यांसह आदींची उपस्थिती राहणार आहे.तरी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बालाजी एल.गाडेकर व सर्व खेळाडूंनी केले आहे.