आज नांदेडमध्ये विश्वास पाटील हे ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ सांगणार…
लसाकमच्या वतीने विश्वास पाटील यांचे व्याख्यान व सत्कार सोहळ्याचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : लहुजी साळवे कर्मचारी महासघ”लसाकम” च्या वतीने प्रख्यात साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘अण्णा भाऊंची दर्दमरी दास्तान’ या पुस्तकाच्या निमित्ताने आज दि.६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कै. नरहर कुरुंदकर समागृह,पीपल्स कॉलेज परिसर नांदेड येथे विशेष व्याख्यान व सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असून विश्वास पाटील हे ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ सांगणार असल्याने या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन लसाकमचे जिल्हा सचिव संजय मोरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे हे,तर माजी आमदार अविनाश घाटे, ॲड.सुरेंद्र घोडजकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी व्ही.जे.वरवंटकर,नांदेड मनपाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे,सहाय्यक अभियंता प्रकाश कांबळे, पुण्यातील लेखक सोपान खुडे यासह आदींची.प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार प्राप्त कामेश्वर घोडजकर,कु.लक्ष्मी पेडलेवार, बालसाहित्यिक नचिकेत मेकाले,गायिका माधुरी मानेराव यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
विश्वास पाटील हे भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी व मराठीतील प्रसिद्ध लेखक,साहित्यिक आहेत.त्यांच्या पानिपत,पांगिरा महानायक,संभाजी, चद्रमुखी,झाडाझडती अशा आदी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाच्या दशदिशा धुंडाळून,दुर्मिळ असे कागदपत्रे शोधून,अण्णा भाऊ साठेंचे जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा खास शोध घेऊन ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ ही संशोधनात्मक चरित्रगाथा लिहली आहे.या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या अनुषंगाने साहित्यिक विश्वास पाटील यांचे व्याख्यान व उपरोक्त सन्मानार्थींचा सत्कार सोहळा आज आयोजित केले आहे. विश्वास पाटील ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ सांगणार असल्याने या कार्यक्रमास लसाकमचे पदाधिकारी व कार्यकर्ते,साहित्य व परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लसाकमचे मराठवाडा अध्यक्ष निरंजन तपासकर,जिल्हाध्यक्ष प्रा.सी. एल.कदम व जिल्हा सचिव संजय मोरे यांनी केले आहे.