Thu. Jan 9th, 2025

आजारी पडू नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता सर्वात महत्वाची आहे-श्याम बाबू

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : घर व परिसराची स्वच्छता जेवढी महत्वाची आहे,त्याच प्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे,आजारी पडू नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता सर्वात महत्वाची आहे,असे प्रतिपादन वर्ल्ड व्हिजन सेवाभावी संस्थेचे शाखा व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी व्यक्त केले आहे. दि.६ एप्रिल रोजी मौ.किनी ता.भोकर येथे संपन्न झालेल्या दिव्यांग जनजागृती सभेला संबोधित करतांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

वर्ल्ड व्हिजन सेवा भावी संस्था ही समाजातील दुर्लक्षित आणि अतिसंवेदनशील व्यक्तींसाठी कार्यरत आहे.वर्ल्ड व्हिजनच्या वतीने दि.६ एप्रिल २०२२ रोजी मौ.किनी ता.भोकर येथे दिव्यांग जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून श्याम बाबू पट्टापू हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, जीवनात वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आहे.यातून अनेक रोगांपासून आपले संरक्षण होते आणि आपले शरीर निरोगी ठेवले जाते.हे न केल्यास आपण आजारी पडू शकतोत व  आपल्या काळजीवाहकांवर ओझे होऊ शकतोत.

त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करून स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी वर्ल्ड व्हिजन संस्था ही अपंगांना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूक करण्यासाठी हायजीन किट प्रदान करत आहे.या किटमध्ये टूथ पेस्ट,टूथब्रश,कंगवा,नेल कटर आणि पिशवीसह चार साबण अशा आदी उपयोगी साधन व वस्तूचा समावेश आहे.असे ही ते म्हणाले. याच बरोबर वर्ल्ड व्हिजनची टिम ही प्रत्येक गावात जनजागृती शिबिर आयोजित करेल आणि अपंगांना या किट्सचे वाटप ही केल्या जाणार आहे.याच अनुशंगाने या जनजागृती सभे प्रसंगी जिल्हा परिषद शाळा किनी येथे वर्ल्ड व्हिजनच्या वतीने उपरोक्त किटचे वाटप करण्यात आले. यावेळी समन्वयक बिबीचंद्र जाधव,गावचे सरपंच,शाळेचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, स्वयंसेवक संदीप व बोजणे यांची उपस्थिती होती.तर अपंगांच्या काळजीवाहूंनी त्यांच्या गरजा ओळखल्याबद्दल आणि अनेक मार्गांनी पाठिंबा दिल्याबद्दल वर्ल्ड व्हिजन संस्थेची अनेकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.सदरील सभा यशस्वीतेसाठी वर्ल्ड व्हिजनचे कर्मचारी श्रीनिवास व आदींनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !