आजचा ‘पराजय’ उद्याचा ‘जय’असतो!- महंत प्रभाकर कपाटे
साईनाथ भाऊ गौड मित्र मंडळ,भोकर आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यातील २१ हजाराचे प्रथम पारितोषिक पटकावले पिंपळगाव संघाने
पारितोषिक वितरण प्रसंगी माजी सभापती गोविंद पाटील आणि पो.उप.नि.अनिल कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : क्रीडा क्षेत्र असो वा अन्य कोणतेही त्यात ‘जय’ पराजय असतोच,परंतु पराजित व्यक्ती किंवा संघाने खचून जायचे नसते.कारण आजच्या ‘पराजयात’ उद्याचा ‘जय’ असतो.असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते महंत प्रभाकर बाबा कपाटे यांनी व्यक्त केले.साईनाथ भाऊ गौड मित्र मंडळ,भोकर आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या पारितोषिक वितरण व माजी सभापती गोविंद पाटील आणि पो.उप.नि.अनिल कांबळे यांचा वाढदिवस सोहळ्या प्रसंगी भोकर येथे ते बालत होते.
साईनाथ भाऊ गौड मित्र मंडळ,भोकर यांच्या वतीने भोकर येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट च्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.दि.१० डिसेंबर २०२१ रोजी शुभारंभ झालेल्या या सामन्यांत जवळपास ७६ ग्रामीण संघांनी सहभाग घेतला होता.सदरील सामन्यांचा समारोप दि.३ जानेवारी २०२२ रोजी झाला.या औचित्याने पारितोषिक वितरण व माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील आणि पो.उप.नि.अनिल कांबळे यांच्या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन साईनाथ भाऊ गौड मित्र मंडळ,भोकर यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी प्रख्यात वक्ते तथा श्रीकृष्ण मंदीर भोकर चे प्रमुख महंत प्रभाकर बाबा कपाटे, मौलाना मुबीनखान इनामदार,संपादक उत्तम बाबळे, उत्तमराव दराटीकर,बालाजी दत्तात्रय पाटील गौड,डॉ. बालाजी पाटील आंदबोरीकर,मिर्झा ताहेर बेग,अब्दुल लतिफ भाई,पत्रकार गंगाधर पडवळे,जुनेद भाई,माजिद पटेल यांसह आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते संदिप पाटील गौड व आयोजकांनी भोकर पंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील आणि भोकर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पो.उप.नि. अनिल कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते अमोल शहागंठवार, श्रीनिवास कलेक्शन भोकर च्या वतीने ठेवण्यात आलेले प्रथम पारितोषिक(३१ हजार रुपये)-पिंपळगाव ता.हदगाव या विजेत्या संघास देण्यात आले.प्रशांत आडे,जगदंबा कलेक्शन भोकर यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक(११ हजार रुपये)-जांभळी ता.भोकर या विजेत्या संघास देण्यात आले.तर अब्दुल लतिफ भाई,नाईस कलेक्शन च्या वतीने तृतीय पारितोषिक(७ हजार रुपये)-तामसा व टाकराळा या दोन संघांना विभागून देण्यात आले.याच बरोबर मॅन ऑफ दि सिरीज(२ हजार ५५१ रुपये)-शहबाज खान मौली तामसा,बेस्ट बॉलर(२ हजार ५०० रुपये)-अनिल बेरदेवाड तामसा,बेस्ट ऑल राऊंडर(१ हजार ५०० रुपये)-असलम पटेल, बेस्ट बैट्समन(१ हजार ५०० रुपये)-सोमेश,मैन ऑफ दी मॅच फाईनल(१ हजार ५०० रुपये)-प्रशांत आडे यांना देण्यार आले.
याप्रसंगी मौलाना मुबीनखान इनामदार,संपादक उत्तम बाबळे,डॉ.बालाजी पाटील आंदबोरीकर,मिर्झा ताहेर बेग यांनी आपल्या मनोगतातून वाढदिवसाच्या औचित्याने दोन्ही सत्कारमुर्तींना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि विजयी संघांचे अभिनंदन तथा पराजित संघांना भावी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.तर सत्कारमुर्ती माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील व पो.उप.नि.अनिल कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.तसेच विजयी संघांचे अभिनंदन व पराजित संघांना भावी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना महंत प्रभाकर बाबा कपाटे पुढे म्हणाले की,सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रिद अंगिकारुन पो.उप.नि. अनिल कांबळे हे जनसंरक्षणार्थ न्यायप्रिय कर्तव्यसेवा बजावत आहेत.तसेच माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांचे भोकर तालुका व जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक,राजकीय यासह आदी क्षेत्रात अमुल्य योगदान आहे.या दोन्ही सेवाभावी व्यक्तीमत्वांच्या हातून यापुढेही अशीच जनसेवा घडो व त्यांना निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य मिळो यासाठी मनापासून शुभेच्छा.सदरील सामन्यांच्या दरम्यान व अंतिम सामन्या प्रसंगी बहुसंख्य खेळाडूंसह प्रेक्षकांनी क्रिकटचा आनंद घेतला.आणि पारितोषिक वितरण प्रसंगीही उपस्थिती लावली.ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांचा यशस्वितेसाठी काँग्रेसचे युवा नेते साईनाथ गोविंद पाटील गौड,नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस संदिप भाऊ गौड,आयोजक सहारा क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू,आदिनाथ चिंताकुटे व आदींनी परिश्रम घेतले आहेत.