Mon. Dec 23rd, 2024

आगामी सर्व निवडणुका वंचित ब.आघाडी ताकतीने लढेल- सुनील कांबळे

Spread the love

पत्रकारांच्या यथोचित सत्कारासह पत्रकार परिषदेचे ही करण्यात आले होते आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर प्रतिनिधी : श्रद्धेय अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्मातील उपेक्षित,वंचिंतांना राजकीय क्षेत्र व विविध स्तरावर न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.त्यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे भोकर तालुक्यातील आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकतीने लढणार असून वंचित,उपेक्षितांना राजकीय हक्क मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे यांनी दि.१८ सप्टेंबर रोजच्या भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या भोकर तालुकाध्यक्षपदी सुनील कांबळे यांची नुकतीच फेर निवड झाली असल्याने दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी वंचित बहुजन आघाडी भोकर शहर शाखेच्या पदाधिका-यांच्या निवडीच्या अनुशंगाने शासकीय विश्रामगृह भोकर येथे एक महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी तालुकाध्यक्ष सुनील कांबळे, तालुका महासचिव सुमेश फुगले,साईनाथ हामंद,प्रसिद्धी प्रमुख माणिक जाधव,तालुका उपाध्यक्ष पुंजाजी डोखळे, शेख शब्बीर,चंद्रकांत चव्हाण,सचिव मारोती वाघमारे, चंद्रकांत धमसे,संघटक गोकुळ राठोड,समक्य चौंदते, परमेश्वर मोरे,जळबा शिरसागर,वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शेषराव जाधव,जितेंद्र राठोड,रमेश लोमटे संपर्कप्रमुख गजानन ढोले यांच्या मुख्य उपस्थित भोकर शहर कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख आजिम शेख मेहबूब, महासचिव सतिश जाधव, उपाध्यक्ष मो.मझरोद्दीन मो. नईमोद्दीन,अंकुश चव्हाण,शेख अरशद शेख सादेकअली, सचिव शेख आदिल शेख हमीद,शेख शारुख पाठण,यशवंत जाधव,संघटक-शेख रहीम शेख मेहबूब,मो.इलियास मो. खादर,शेख खदीर शेख बशीर, श्रीनिवास कदम,तर आय टी प्रमुख -मो.सलमान मो.यासिन,संपर्क प्रमुख- शेख शबीर शेख बशीर,संघटक -तौफिक शेख शादुल,सल्लागार -मुबीन अली खुर्शीद अली आणि सदस्य म्हणून शेख फयुम शेख मोहम्मद,गणेश मुळेकर,शेख अमजत शेख जिलानी,जावीद कुरेशी शेख फरीद,शेख वाजीद खा कुदरत,शेख दस्तगीर शेख अल्लावली,अब्दुल हमीद अब्दुल करीम,शेख अहेमद, रहीम पाठण अशरफ पठाण यांसह आदींची निवड करण्यात आली.यावेळी तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहर कार्यकारिणीच्या या नुतन पदाधिका-याचे पुष्पहार देऊन अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांच्या यथोचित सत्कारासह पत्रकार परिषदेचे ही करण्यात आले होते आयोजन

या निवडीनंतर तालुकाध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकारांच्या सत्काराचे व पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली व वंचित बहुजन आघाडीच्या उपरोक्त सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या सत्कार समारंभात सुनील कांबळे व पदाधिका-यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, प्रा.आर.के.कदम,कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,सल्लागार विठ्ठल सुरलेकर,बालाजी कदम पाटील यांसह आदी पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करुन भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तर सुनील कांबळे यांची तालुकाध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.तर सत्कारास उत्तर देतांना संपादक उत्तम बाबळे व पत्रकार बालाजी नार्लेवाड यांनी सद्याच्या पत्रकारितेपुढील आव्हाने व समाजाची भुमिका मांडली.तसेच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे पुढे म्हणाले की,भोकर तालुक्यात आगामी काळात येणाऱ्या भोकर नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायती, सर्वच निवडणुका आम्ही मोठ्या ताकतीने लढवणार आहोत. पक्षाचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही नुतन तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारिणीची निवड केली असून यात सर्व जाती- धर्माच्या होतकरु,जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना वाव दिला असून वंचित,उपेक्षित व गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कार्यकर्त्यांचा या निवडीत समावेश केला आहे,असे ही ते म्हणाले.पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुमेश फुगले यांनी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !