अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे तपासाबाबतचा असंविधानिक प्रस्ताव नाकारावा!
यासह आदी विषयास अनुसरून अॅट्रासिटी अॅक्ट संरक्षण समन्वय समिती नांदेडच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ) व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट ब) दर्जाच्या कनिष्ठ पोलीस अधिका-यांना प्रदान करण्याचा अधिकार राज्य शासनाच्या गृहविभागाने प्रस्तावित केला असून तो असंविधानिक आणि अन्यायकारक प्रस्ताव त्वरीत नाकारण्यात यावा यासह आदी मागण्यांचे एक निवेदन अॅट्रासिटी अॅक्ट संरक्षण समन्वय समिती नांदेडच्या शिष्टमंडळाने दि.४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्य शासनाकडे दिले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृहविभागाने दि.१० जानेवारी २०२२ रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रासिटी अॅक्ट) अंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ) व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट ब) दर्जाच्या कनिष्ठ पोलीस अधिका-यांना प्रदान करण्याचा अधिकार एका पत्राद्वारे प्रस्तावित केला आहे.ही बाब विधी मंडळाच्या निर्णयाच्या अधिन नसल्याने असंविधानिक व अन्यायकारक आहे.त्यामुळे सदरील प्रस्तावित बाब राज्य शासनाने त्वरीत नाकारावी, अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याचे/तपासाचे खटले चालवण्यासाठी जलदगती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांचा तपास हा नि:पक्षपातीपणे व जलदगतीने व्हावा आणि दलित-आदिवासी जमातीवर होणार्या अत्याचाराविषयी न्याय मिळवा यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा निर्माण करावी, यासह आदी मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजीक्षअॅट्रासिटी अॅक्ट संरक्षणार्थ स्थापन करण्यात आलेल्या अॅट्रासिटी अॅक्ट संरक्षण समन्वय समिती नांदेडच्या शिष्टमंडळाने दिले आहे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व समन्वय समितीचे अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी केले आहे.तर या शिष्टमंडळात समन्वय समितीचे महासचिव सतीश कावडे,डॉ.विठ्ठल भंडारे,दिगंबर मोरे, परमेश्वर बंडेवार,मच्छिंद्र गवाले,अॅड.एम.जी.बादलगावकर, अॅड.बी.एम. गायकवाड,जे.डी.कवडे,नंदू बनसोडे,प्रा. देवीदास मनोहरे,प्रा.इरवंत सूर्यकार,मालोजी वाघमारे,इंजि. भरत कानिंदे,इंजि.एस. पी.राके,इंजि.अशोक गायकवाड, पिराजी गाडेकर,संभाजी सोमवारे, सुधाकर सोनसळे,शंकर शिरसे,आनंद वंजारे,एस.डी.दामोदर,आकाश सोनटक्के, प्रसेनजित मांजरमकर,नागेश तादलापूरकर,मिलींद मस्के, गौतम मस्के यांसह आदींचा समावेश असून सदरील मागण्यांच्या निवेदनावर उपरोक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.