अरेरे...कोश्यारींच्या प्रतिमेला चपलांनी मारलं व जाळलं ही
भोकर मध्ये अशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छावा व मुस्लिम लिगने केला ‘त्या’ बेताल वक्तव्याचा’ निषेध
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक ‘बेताल वक्तव्य’ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अखिल भारतीय छावा संघटना व मुस्लिम लिगसह आदी पक्ष आणि संघटनांनी भोकरमध्ये दि.२१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेला चपलांनी मारलं आणि जाळलं ही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (छत्रपती संभाजी महाराज नगर) येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलून अनेकांच्या भावना दुखविल्या.त्यांच्या ‘त्या’ बेताल वक्तव्याचा दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अखिल भारतीय छावा संघटना,मुस्लिम लिंग व आदी पक्ष आणि संघटनांनी विविध घोषणांनी तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला.तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला चपलांची मारलं व नंतर जाळलं ही.या निषेधांदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोकर विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष सतिश देशमुख,तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,शिवसेना युवा तालुकाधिकारी आनंद जाधव हस्सापुरकर,शहराधिकारी कृष्णा कोंडलवार,संतोष आलेवाड,रामा भालेराव,विशाल बुद्देवाड,परमेश्वर राव,श्याम वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद देशमुख कामनगावकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर, तालुकाध्यक्ष अभियंता विश्वंभर पवार,तालुका कार्याध्यक्ष ॲड.शिवाजी कदम,शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,युवकचे तालुकाध्यक्ष गणेश ऊर्फ पप्पू बोलेवार,सिद्धेश्वर पाटील चिंचाळकर,आनंद पाटील सिंधीकर,अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शंकर पाटील बोरगावकर,मुस्लिम लिगचे शेख अकबर,वहाब खान यांसह उपरोक्त पक्ष व संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर यावेळी पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अनिल कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या निषेधांदोलनाच्या सांगतेनंतर उपरोक्त आंदोलनकर्त्यांतील काही प्रमुखांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले व आंदोलन प्रकरणी त्यांच्या विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलमांतर्गत नोंद घेऊन सोडण्यात आले.