…अखेर त्या बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
भोकर तालुका व शहरात रुग्णांच्या जीवित्वाशी खेळणाऱ्या ‘त्या’ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती – तहसिलदार राजेश लांडगे
तालुक्यातील ग्रामीण भागात उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणारच – डॉ.राहुल वाघमारे
आरोग्य पथकावर झालेल्या भ्याड हल्याचा तालुका आरोग्य विभाग अधिकारी आणि कर्माच्याऱ्यांनी केला जाहीर निषेध!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.सावरगाव मेट येथील बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुका आरोग्य विभाग पथकास तेथील काही भावनिक नागरिकांनी विरोध दर्शविल्याच्या नामी संधीचा फायदा घेऊन ‘त्या’ बोगस डॉक्टरने औषधी व उपचार साहित्य घेऊन पळ काढला.परंतू तालुका आरोग्य अधिकारी तथा पथक प्रमुख डॉ.राहुल वाघमारे यांनी दिलेल्या सरकारी तक्रारीवरुन अखेर दि.२९ सप्टेंबर रोजी भोकर पोलीसांत ‘त्या’ पश्चिम बंगाली बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या प्रकरणी तहसिलदार राजेश लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,तालुका व शहरात रुग्णांच्या जीवित्वाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी आम्ही दोन पथकांची नियुक्ती केली आहे. तर ग्रामीणचे पथक प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले आहे की,तालुक्यातील ग्रामीण भागात काही भावनिक नागरिकांनी विरोध दर्शविला तरी कायदाचे पालन करत अशा प्रकारे गैर पद्धतीचा उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आम्ही कारवाई करणारच आहोत.
सावरगाव मेट व सोनारी गावांत बोगस डॉक्टर नागरिकांवर उपचार करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन तालुका आरोग्य पथकाचे प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांनी दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी चक्रधर खानसोळे यांना डमी रुग्ण म्हणून सावरगाव मेट येथे पाठविले व वैद्यकीय अधिकारी डॉ. लालू बोर्डे,एम.ए.सयद,डी.एस.माचेवाड,एस.के.शेख आणि जमादार दता कदम यांचा समावेश असलेले पथक सावरगाव मेट पाटी जवळ थांबले. काही वेळाने डमी रुग्ण चक्रधर खानसोळे यांनी या पथकास तो बोगस डॉक्टर चपचार करत आहे अशी माहिती दिली.यावरुन एका खासगी वाहनाने हे पथक सावरगाव मेट येथे गेले व सुभाष बंदगीलवाड यांच्या घरी किरायाने राहत असलेला हिमांशु मिश्रा विश्वास वय(४०) रा. कोलकत्ता ह.मु.सावरगावेट हा बोगस डॉक्टर दोन उग्णांवर उपचार करत असतांना त्यास रंगेहात पकडले. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याचकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसल्याची गंभीर बाब समोर आली.तसेच त्याने सांगितले की एका डॉक्टचे काम पाहुन हे शिकलो आहे व ऑलोपॅथीक उपचार करतो.यावेळी पथकाने त्याच्या पिशवी व कपाटातील जवळपास १० हजार रुपयाची ऑलोपॅथी औषधी आणि उपचार साहित्य जप्त केले.तसेच त्यास कारवाईस्तव भोकर येथे घेऊन येत असतांना काही भावनिक नागरिकांनी त्यास घेऊन जाण्यास विरोध दर्शविला. या नामी संधीचा फायदा घेऊन त्या बोगस डॉक्टरने घटनास्थळावरुन जप्त केलेल्या औषधी व साहित्यासह पळ काढला.या प्रकरणी दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी डॉक्टर राहुल वाघमारे यांनी फिर्याद दिल्यावरुन बोगस डॉक्टर हिमांशू मिश्रा विश्वास याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय सेवा आधिनियम १९६१ कलम – ३३,३३(ए) अन्वये भोकर पोलीसात गुन्हा करण्यात आला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगंबर पाटील हे पुढील अधिक तपास करत आहेत.
भोकर तालुका व शहरात रुग्णांच्या जीवित्वाशी खेळणाऱ्या ‘त्या’ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती-तहसिलदार राजेश लांडगे
उपरोक्त बोगस डॉक्टरचे बोगस उपचार प्रकरण उघडकीस आल्याने प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्याकडे डॉक्टर असोशिएशन व काही नागरिकांचे बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करावी म्हणून निवेदने आली आहेत.त्या अनुशंगाने कारवाईस्तव गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी आणि वैद्यकीय अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भोकर शहरात अशी दोन पथके नियुक्त करण्यात आले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सावरगाव मेट येथील बोगस डॉक्टर विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.यापुढेही ही अशा प्रकारे छापे टाकून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.
तालुक्यातील ग्रामीण भागात उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणारच -डॉ.राहुल वाघमारे
सावरगाव मेट येथील बोगस डॉक्टरच्या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी प्राप्त न केलेले परप्रांतीय काही बोगस डॉक्टर हे गरीब, गरजू नागरिकांच्या भावनिकतेचा गैर फायदा घेत त्यांच्यावर उपचार करत आहेत.अशाच प्रकारच्या हिमांशू मिश्रा विश्वास या पश्चिम बंगाली बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवित्वाशी खेळत होता.त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी मी व आमचे पथक गेलो असता काही भावनिक नागरिकांनी त्याचे समर्थन केले आणि आमचा विथोध केला.परंतू हे गैर कायदाचे असल्यामुळे आम्ही त्या भावनिकतेच्या आहारी पडणार नाही व बोगस डॉक्टरांविरुद्ध योग्य ती कारवाई करणारच.त्या कारवाईस सामोरे जायचे नसेल तर त्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन आमच्याकडून तात्काळ तपासणी करुन घ्यावी,अन्यथा कारवाई होणारच,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
आरोग्य पथकावर झालेल्या भ्याड हल्याचा तालुका आरोग्य विभाग अधिकारी व कर्माच्याऱ्यांनी केला जाहिर निषेध
सावरगाव मेट येथील बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यासाठी दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी त्या गावी गेलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे व त्यांच्या आरोग्य पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यातांना तेथील काही भावनिक नागरिकांनी मज्जाव केला.यावेळी त्यांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला. याचा फायदा घेऊन त्या बोगस डॉक्टरने पळ काढला.हा प्रकार निषेधार्य असून कादाची पायमल्ली करणारा असल्यामुळे व अधिकारी आणि कर्मचारी हे सुरक्षित नसल्याने या घटनेचा भोकर तालुका आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला आणि काळ्या फिती लाऊन कामकाज केले.तसेच दोषी व्यक्तीवर योग्य ती कार्यवाई करण्यात यावी यासह आदी मागण्यांचे निवेदन प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांना देण्यात आले.त्या निवेदनावर आरोग्य कर्मचारी आर.डी.कसबे,व्ही.बी.गोवंदे,जी.ए.तमलवाड,श्रीमती ए.एस.जटालवार,श्रीमती एस.एम.कवडेकर,श्रीमती व्ही.पी. राक्षसमारे,व्ही.व्ही.भोळे,पी.ए.तमलवाड,एन.एन.कंधारे,एस.पी. राठोड,एस आर.पवार,शे.वहाब शे.रहीम,एस.बी.टिप्रेसवार, एन.पी.उदगिरे,श्रीमती ललिता बास्टेवाड,श्रीमती ए.जी.बंडावार यांसह आदी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.